नेपाळच्या पंतप्रधानांनी घेतली भारतीय बनावटीच्या EXER ई-बाइक ची राईड

13

पुणे, २२ जुलै २०२२: इलेक्ट्रिक बाइक हे पुढील भविष्य मानलं जात आहे. भारतातील कंपन्या देखील यात आपलं महत्त्वाचं योगदान देताना दिसत आहेत. अशाच एका भारतीय कंपनीने आता विदेशात देखील आपली छाप सोडली आहे. पुण्यातील EXER आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज मिळून ही ई-बाईक मॅन्युफॅक्चरिंग करते. या एक्सर बाईक ची धाव आता नेपाळपर्यंत गेली आहे. नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा यांनी ही बाईक चालवली आहे.

पुण्यातील चाकण येथे एक्सर बाईकचं उत्पादन होत आहे. विशेष म्हणजे ही बाईक पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. देशातच नाही तर आता देशाबाहेर देखील एक्सर बाईकला मागणी येताना दिसत आहे.


V 80/150, G 80/150 आणि C 80 असे मॉडेल्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या बाईकचा वेग ताशी 25 ते 55 किलोमीटर एवढा आहे. यातील G 150 मॉडेलचा स्टॉप स्पीड ताशी 100 ते 120 किलोमीटर एवढा आहे.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे