गोल पोस्ट राष्ट्रीय राममंदिरा सारखेच दिसणार अयोध्याचे रेल्वे स्टेशन , कधी पुर्ण होणार घ्या जाणून…..

राममंदिरा सारखेच दिसणार अयोध्याचे रेल्वे स्टेशन , कधी पुर्ण होणार घ्या जाणून…..

आयोध्या, ३ ऑगस्ट २०२० : येत्या ५ ऑगस्टला अयोध्यामध्ये भव्य राममंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. मात्र अयोध्यामध्ये केवळ राममंदिरच नाही तर यासोबतच संपुर्ण अयोध्याचाच कायापालट झाला आहे. भारतीय रेल्वेने सांगितले की, नवीन अयोध्या स्टेशनचे पहिल्या टप्प्यातील निर्मितीचे काम जून २०२१ पर्यंत पुर्ण होईल. विशेष गोष्ट म्हणजे हे स्टेशन राममंदिरासारखेच दिसणार आहे. येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील.

उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव चौधरी यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात प्लॅटफॉर्म संख्या १, २/३ चे काम, आजूबाजूचा परिसर, पायऱ्या आणि पॅसेज इत्यादीचे काम पुर्ण केले जाईल. या स्टेशनच्या निर्मितीला २०१७-१८ मध्ये मंजूरी मिळाली होती. याच्या निर्मितासाठी जवळपास १०४ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

रेल्वमंत्री पीयूष गोयल यांनी देखील अयोध्या रेल्वे स्टेशनच्या मॉडेलचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, देशातील कोट्यावधी लोकांच्या आस्थेचे प्रतिक असलेल्या रामजन्मभूमी मंदिराचे दर्शन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या नेतृत्वात रेल्वे अयोध्या स्टेशनचा पुनर्विकास करेल.

या स्टेशनचे महत्त्व लक्षात घेऊन येथे येणाऱ्या प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा, स्वच्छता, सुंदरता व इतर सेवा देण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version