लांजा, २१ जून २०२० : जूनी संस्कृती अधिक आधुनिक होती. आदिवासी परंपरेनुसार ताटात मुसळ उभे करून सूर्य ग्रहण पहाताना.आदिवासींना गुरुत्वाकर्षणाची संकल्पना अनुभवाने माहिती होती.
पृथ्वी, चंद्र व सुर्य एका रेषेत येतात त्यामुळे मुसळाची लोखंडी सांब पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने व चुंबकीय शक्तीने पृथ्वीच्या मध्याकडे ओढली जाते तर मुसळाचा लाकडी दांडा सुर्य व चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणाने त्यांच्याकडे आकर्षित होतो. त्यामुळे जोपर्यंत पृथ्वी, सूर्य, चंद्र एका रेषेत म्हणजे ग्रहस्थितीत असतात तोपर्यंत मुसळ उभा राहतो .
परंतु पृथ्वी स्वतःभोवती व सुर्या भोवती फिरत असल्याने लवकरच हे तीनही खगोल आपापले स्थान बदलून रेषेबाहेर जातात त्यावेळी गुरुत्वाकर्षण व चुंबकीय शक्तीची रेष बदलल्याने मुसळाचे संतुलन बिघडून तो खाली पडतो.
समुद्रात भरती ओहोटी सुद्धा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे होत असते. आज सुर्यग्रहणात, लांजा येथे अंगणात ग्रहण काळात उभे राहिलेले मुसळ हे ग्रहण संपले की आपोआपच खाली पडले.
न्यूज अनकट प्रतिनिधी