ओमिक्रॅानचे वास्तव आणि वास्तव्य

मागील दोन वर्षीपासून जगात कोरोनाने  थैमान घातले असताना आता २०२१च्या शेवटाला या ओमिक्रॅानने जगाची धडधड वाढवली आहे. कोरोना , डेल्टा आणि आता ओमिक्रॅान याने पुन्हा एकदा जगाच्या काळजाचा ठोका चुकवला. दक्षिण अफ्रिकेतून आलेला हा विषाणू नक्की आहे तरी काय, हे संक्षिप्त रित्या जाणून घेऊया.
डेल्टाचा है पुढचा प्रकार असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा विषाणूमध्ये बदल होतो किंवा नवीन तयार होतो, तेव्हा तो अधिक बलवान किंवा अधिक कमकुवत होतो. जर बलवान असेल तर प्रसार जोमाने होतो.पण जर कमकुवत असेल तर प्रसार कमी प्रमाणित होतो. हा विषाणू बलवान असल्याने कुटूंबे जास्त बाधित होतात आणि त्याचमुळे जगात सगळ्यांनी याचा धसका घेतला आहे. जेव्हा विषाणू बलवान असतो , तेव्हा तुमची नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती यासमोर कमी पडते. हेच कारण आहे, की ज्यामुळे सर्वजण या विषाणूला घाबरले आहेत. ज्यामुळे सध्याचे लसीकरण यापुढे कमी प्रभावी ठरत आहे. या विषाणूची पुनरुत्पादन संख्या ही १.९३ असल्याचे आढळले. त्यामुळे दोन रुग्णांपासून सहा दिवसात रुग्णसंख्सा चौपट होते. कुटूंबे बाधित होऊ शकतात. म्हणूनच हा विषाणू जास्त धोकादायक असल्याचं तज्ञांचे मत आहे.
अफ्रिकेत केवळ ७२ तासात हा विषाणू पसरला असून बोटस्वाना या देशात हा पहिल्यांदा आढळला. तेथून सध्या भारतात बेंगळूर आणि महाराष्ट्रात डोंबिवली येथे यांचे रुग्ण आढळले आहेत. यांचा प्रसार होऊ नये म्हणून सोशल डिस्टटिंगचा वापर करणे, मास्क वापरणे , गर्दी टाळणे या नियमांचा अवलंब करणे, गरजेचे आहे. सध्या सगळीकडे उघडीप होत असताना , नव्या वर्षीच्या आगमनापूर्वीच या विषाणूवर प्रतिबंधक उपाय शोधणे, सरकारला अनिवार्य आहे, हे नक्की.
न्यूज अनकट प्रतिनिधी -तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा