लोखंडी पुलाचे अवशेष भगवान गौतम बुद्धांच्या स्मारकासाठी वापरण्यात यावेत

जालना, दि.३० मे २०२०: दीडशे वर्षांपूर्वीचा इतिहास सांगणारा जालना शहरातील कुंडलिका नदीवरील लोखंडी पूल आता तोडण्यात येत आहे. मात्र पुल तोडण्याचे काम अशास्त्रीय पद्धतीने केले जात असून तांत्रिक सल्लागार समितीच्या वतीने हा पुल तोडण्यात यावा. तसेच शहरातील मोती तलावात उभारण्यात येणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या स्मारकाजवळ जाण्यासाठी या पुलाचे अवशेष वापरण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश डेहेडकर ,महारष्ट्र प्रभारी दिनकर घेवंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

या मागणीचे निवेदन शदेहेडकर यांनी सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, जालना शहरातील या लोखंडी पुलाचे अवशेष हे ऐतिहासिक वारसा म्हणून जतन केले पाहिजे. सध्या पुल तोडण्याचे जे काम सुरू आहे, ते पूर्णपणे अशास्त्रीय पद्धतीने केले जात आहे.

या पुलाच्या रचनेचा अभ्यास करून तांत्रिक सल्लागार समितीच्या वतीने हा पुल तोडण्यात यायला हवा होता. मात्र, पुल तोडण्याचे काम बेजबादारपणे केले जात असून येथे काम करणाऱ्या कामगारांना कोणत्याही सुरक्षा पुरवण्यात आलेल्या नाही. एखादी दुर्घटना झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार ? असा सवाल या निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.

अशी घटना घडल्यास संबंधित अभियंत्यांना जबाबदार धरण्यात यावे. जिथे नगरपालिका स्वतः ची एकही मालमत्ता सांभाळू शकली नाही, तिथे या पुलाच्या अवशेषांचे जतन कसे करणार ? प्रश्न उपस्थित करून मोती तलावात उभारण्यात येत असलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या स्मारकाजवळ जाण्यासाठी या लोखंडी पुलाच्या अवशेषांचा उपयोग करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तथापि, या मागणीचे निवेदन रमेश डेहेडकर, दिनकर घेवंदे यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांना देखील पाठवले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा