परतीच्या पावसामुळे ज्वारीच्या पेरण्या रखडल्या

बारामती, १४ ऑक्टोबर २०२० : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे .या भागातील पावसामुळे भागातील रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरण्या लांबल्या आहेत.सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे ऊस,मका पिके भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

बारामती तालुक्यात वादळी पावसामुळे ऊसाचे मोठे नुकसान झाले असल्याचे काळखैरेवाडीचे माजी सरपंच विलास खैरे यांनी सांगितले . तरकारी व कांद्याच्या रोपाच्या शेतातील सरी पाण्याने तुडुंब भरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.सोमवारी सुमारे ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे .या हंगामात आत्तापर्यंत ६६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती दिपक साठे यांनी दिली.

यावेळी रब्बी हंगामाच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांना कांदा रोपे जळुन गेली. येथील शेतकऱ्यांना १२ ते १५ हजार रुपये कांद्याच्या बी विकत घेतले होते. मागील महिनाभर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.या परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना पंधरा दिवस शेतात काम करता येणार नाही त्यामुळे रब्बी हंगामातील रखडलेल्या ज्वारीच्या पेरण्या आणखी लांबणार आहेत. मागील महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे खरीपाच्या बाजऱ्यांचे तसेच ऊस, मका, कांदा रोपे आदीचे नुकसान झाले आहे.त्याचे नुकसान भरपाई अद्याप शासनाकडुन मिळाली नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा