परतीच्या पावसाने पिकांचे सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी

इंदापूर, १३ ऑक्टोबर २०२०: इंदापुर तालुक्यातील निमसाखर येथे सततच्या होणाऱ्या पाऊसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असल्याने पर्जन्यवृष्टीचे मोजमाप करावे, कागदी घोडे नाचवण्यापेक्षा सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकाऱ्यांमधून करण्यात येत आहे.

सध्या होत असलेल्या सततच्या पाऊसामुळे एकीकडे पाण्याचा प्रश्न जरी मार्गी लागणार म्हणून दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे अती पाऊसामुळे शेतातील शेत पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर बऱ्याच प्रमाणात या वर्षी होणाऱ्या पेरण्याही लांबणीवर पडल्याने शेतात पिकच नसल्याने गवताचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे दिसून येते.

सध्या ६५ मिलीमीटर पैक्षा अधिक पर्जन्यवृष्टी झालेल्या ठिकाणीच पंचनामे करण्यात येत आहेत. नुकसान होऊनही तांत्रिक बाबीमध्ये अडकल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने व
प्रशासनाने पर्जन्यमान मोजमाप करून तांत्रिक अडचणी निर्माण करत बसण्यापेक्षा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा