जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क अजूनही बेघर, विकली सर्व घरं!

19

मुंबई, 27 एप्रिल 2022:इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि अलीकडेच त्यांनी सोशल मीडिया कंपनी ट्विटरला $44 बिलियनमध्ये विकत घेण्याची ऑफर दिलीय. सर्वात जास्त संपत्ती असलेल्या व्यक्तीकडे स्वतःचं एकही घर नाही असे जर तुम्हाला सांगण्यात आलं तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. मात्र ते पूर्णपणे सत्य आहे. इलॉन मस्क यांनी काही काळापूर्वी आपली सर्व घरं विकली आहेत आणि सध्या ते मित्रांच्या घरी राहत आहेत.

मस्क मित्रांच्याच घरी घालवतात रात्र

मस्क यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितलं की, ‘माझ्याकडं सध्या स्वतःचं घर नाही. मी खरं तर मित्रांच्या घरी राहतो. ते म्हणाले की जेव्हा ते शहरात कामावर असतात तेव्हा ते टेस्लाच्या मुख्यालयाजवळ असलेल्या सॅन फ्रान्सिस्कोच्या बे एरियामध्ये मित्रांसह राहतात. “जर मी बे एरिया मध्ये जाणार असेल जिथं टेस्ला चे बहुतांश इंजिनियर राहतात तर मी एका मित्राच्या घरातून दुसऱ्या मित्राच्या घरी जात राहतो,” असं ते म्हणाले.

प्रॉपर्टी म्हणून केवळ एकच विमान

मस्क यांनी असंही सांगितलं की त्यांच्याकडं यॉट वगैरेही नाही, जी अनेकदा अब्जाधीशांची पहिली पसंती असते. आपण सुट्या घेत नसल्याचा दावा त्यांनी केला होता. ते म्हणाले होते, ‘माझ्याकडं अपवाद म्हणून एकच विमान आहे. याचं कारण असे की, जर मी विमानाचा वापर केला नाही, तर मला काम करण्यासाठी कमी वेळ मिळेल. याशिवाय माझ्याकडं फारसा खर्च नाही. जर मी स्वत:वर दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खर्च करत असेन, तर ती चिंतेची बाब असेल, पण माझ्या बाबतीत तसं नाही.

झाली आहे सात आलिशान घरांची विक्री

मस्क यांनी मे 2020 मध्ये एका ट्विटमध्ये आपल्या सर्व घरं विकण्याचा इरादा व्यक्त केला होता आणि मला घर नको असल्याचं सांगितलं होतं. गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज यांनी 2015 मध्ये एकदा सांगितलं होतं की जेव्हा मस्क सिलिकॉन व्हॅलीमध्ये असतात, तेव्हा ते त्यांना मेल करतात ‘मला आज रात्री कुठं थांबायचं हे माहित नाही. मी येऊ शकतो का?’ गेल्या वर्षी असंही अहवाल आला होता की मस्क $ 50,000 च्या एका छोट्या घरात राहतात, जे त्यांनी SpaceX कडून भाड्यानं घेतलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा