रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे नऊ तोळ्यांच गंठण केले परत,

अंबरनाथ, २९ऑक्टोबर २०२२: अंबरनाथमध्ये रिक्षाचालकांने प्रामाणिकपणा दाखवत रिक्षात विसरलेलं नऊ तोळ्यांच गंठण परत केल्याची घटना समोर आली आहे‌. मुंबईत राहणाऱ्या आस्था निकम या युवतीच्या घराचं काम सूरु असल्यामुळे तिने आईचे गंठण मामाच्या घरी अंबरनाथला ठेवलं होते.

दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी हे गंठण लागणार असल्याने ते आण्यासाठी आस्था मुंबईहून अंबरनाथला आली, आणि गंठण घेऊन जाण्यासाठी निघाली असता. अंबरनाथ रेल्वे स्टेशनपर्यत रिक्षाने येऊन रेल्वे स्थानकात गेली. मात्र ज्या पर्समध्ये आईचे गंठण ठेवलं ती पर्स रिक्षामध्येच विसरली.

हे तिच्या लक्षांत येताच ती परत मामाच्या घरी गेली आणि सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मामाने ताबडतोप शिवाजी नगर पोलिस स्टेशनला धाव घेत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपास करत रिक्षाचा शोध घेतला. रिक्शा चालक शिवगंगा नगरमध्ये राहणारे रमेश लदगे याच्यासी संपर्क आसता.

लदगे यांनी सांगितले आपल्या रिक्षात एक पर्स महिला विसरुन गेल्याचं सांगितले. यानंतर लदगेनी प्रामाणिकपणे ती पर्स पोलिसांना सुपूर्द केली. आणि आस्था निकम व त्यांच्या परिवारांनी रिक्षाचालक रमेश लदगे याचा सत्कार केला. आणि पोलिसांचे आभार मानले.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा