पुणे, १ डिसेंबर २०२२ : ट्विटरचे नवे मालक एलोन मस्क यांनी गेल्या बुधवारी अॅपलच्या सीईओची भेट घेतली आणि अॅपलच्या मुख्य कार्यालयालाही भेट दिली. मस्क यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली. मस्क यांनी नुकतेच एका ट्विटमध्ये ऍपलवर आरोप केला होता की, ते ट्विटरला त्यांच्या अॅप स्टोअरमधून हटवू शकतात. मात्र, त्यांच्या नवीन ट्विटमध्ये त्यांने सांगितले की, कुक आणि त्यांच्यामधील गैरसमज संपला असून अॅपल असे कोणतेही पाऊल उचलणार नाही.
टेस्लाच्या मालकाने सोमवार, २९ नोव्हेंबर रोजी एक ट्विट केले, ज्यामध्ये त्यांनी लिहिले की ऍपल ने देखील ट्विटरला त्यांच्या अॅप स्टोअरमधून काढून टाकण्याची धमकी दिली आहे. याशिवाय अॅपलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील जाहिराती बंद केल्याचा आरोपही मस्क यांनी केला होता. यावर त्यांनी नंतर कूकच्या ट्विटर अकाऊंटला ट्विटमध्ये टॅग केले आणि विचारले की येथे काय चालले आहे? मात्र, अॅपल किंवा ट्विटरकडून लगेचच कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
इलॉन मस्क यांनी लागोपाठ अनेक ट्विट केले होते, ज्यामध्ये ते अॅपलला विरोध करताना दिसले. ट्विटच्या त्याच मालिकेत, मस्क यांनी अॅपमधील खरेदीसाठी ३०% पर्यंत शुल्क आकारत असलेल्या ऍपलची पोस्ट केली. मस्क यांनी एकमेव पोस्ट केली ज्यामध्ये असे सुचवले आहे, की ते कमिशन देण्याऐवजी ऍपल सोबत “युद्ध करण्यास तयार आहे”. तर आपल्या नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये मस्क यांनी अॅपलच्या ऑफिसला भेट दिल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, मस्क यांनी असेही सांगितले की, ट्विटरला अॅप स्टोअरमधून काढून टाकले जाण्याबाबतचा गैरसमज आम्ही दूर केला आहे. ऍपलने कधीच असे करण्याचा विचार केला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड