शेतकऱ्यांचा हक्काचं पाणी सोडलं चारीला, शेतकऱ्यांनीच उघडले दार

करंदी (ता. शिरूर),दि. १० मे २०२०: करंदी येथील चासकमानच्या धानोरे–कोरेगाव चारीला पाणी सोडण्यासाठी जातेगाव, करंदी, पिंपळे जगतापच्या शेतकाऱ्यांनी चक्री उपोषण केले होते मात्र चासकमानच्या तीन अधिकाऱ्यांनी आज (रविवारी) पाणी सोडण्याचे खोटे आश्वासन देऊन उपोषण मागे घ्यायला लावले त्यानंतर आश्वासनाची पूर्तता होणार नाही असं सांगून शेतकऱ्यांना फसवल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि अखेर या भागातील शेतकऱ्यांनी चासकमानच्या पाण्यावर ताबा घेऊन धानोरे – कोरेगाव शाखेचा दरवाजा उघडा करून पाणी सुरू केले आहे.

आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी या अगोदर पोलिस प्रशासनाला याबाबत कळविले होते मात्र त्या ठिकाणी चासकमानचे अधिकारी फिरकले नाही त्यामुळे शेतकरी देखील चासकमानच्या कालव्यावर ठाण मांडून बसले आहेत.

आमच्या हक्काचं पाणी असून देखील आम्हाला पाणी मिळत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय होत आहे. त्यामुळे यापुढे असा अन्याय आम्ही शेतकरी सहन करणार नाही. आमच्या हक्काचं पाणी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही अगोदर लोकशाही मार्गाने पाणीची मागणी करून उपोषण सुरू केले मात्र ते मोडीत काढून आमच्यावर अन्याय केला म्हणून आम्हाला आमच्या हक्काचं पाणी स्वतः घ्यावं लागले आहे, अशा भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी जातेगाव खुर्द, पिंपळे जगताप, कारंदी, सणसवाडी, कोरेगाव येथील अनेक शेतकरी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा