तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या लेखकाने केली आत्महत्या…

मुंबई, ५ डिसेंबर २०२०: तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेचे लेखक अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केली आहे. अभिषेकची एक सुसाइड नोट समोर आली आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोटही सोडली आहे. यात त्यांनी पैश्याच्या समस्येचा उल्लेख केला आहे.

२७ नोव्हेंबरला अभिषेक यांनी आत्महत्या केली. अभिषेक हे सायबर फसवणूकीचे बळी होते आणि त्यांना ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. अभिषेक मुंबईच्या कांदिवली येथे त्यांच्या घरात पंख्याला लटकलेले आढळले. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. याप्रकरणी कुटुंबाचे निवेदन नोंदविण्यात आले आहे.

कुटुंबाला समस्यांबद्दल माहिती नव्हती

असे सांगितले जात आहे की अभिषेकच्या घरातील सदस्यांना त्यांच्या समस्यांविषयी माहिती नव्हती. त्यांचा भाऊ जेनिस म्हणाले की, लेखकाच्या मृत्यूनंतर त्यांना त्यांच्या आर्थिक त्रासाविषयी माहिती मिळाली, कारण त्यांना वेगवेगळ्या नंबरवरील लोकांचे कॉल येऊ लागले. ते म्हणाले की, ‘मी माझ्या भावाचे ईमेल तपासले. कारण त्यांचा मृत्यू झाल्यापासून लोक मला कॉल करीत आहेत आणि त्यांनी उधार घेतलेले पैसे मागत आहेत.

त्यांनी सांगितले की, त्यांना फक्त भारतातूनच नाही तर बाहेरील देशांकडूनही कॉल येत आहेत. ते म्हणाले, ‘एक कॉल बांगलादेशचा होता, तर दुसरा म्यानमार व काही भारताच्या वेगवेगळ्या भागातून होते.’ जेनिसच्या म्हणण्यानुसार, ‘माझ्या भावाच्या ई-मेल रेकॉर्डमधून मला जे समजले ते म्हणजे ईझी लोन अॅपवरून त्यांच्याकडे एक छोटेसे कर्ज होते, ज्यांचे व्याज थकले होते.’

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा