अंबाजोगाई, बीड ४ जानेवारी २०२४ : बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर हून नवाबवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून येथे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच नागरिकांना ओळखू येत नाहीए. लातूर ला जोडणारा हा महत्वपूर्ण रस्ता असला तरी या खड्डेमय रस्त्या वरुन वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
खड्डे चुकवताना लहान मोठे अपघात झाल्याच्या घटना ही नित्याचीच बाब झाली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना ही रस्त्या वरुन ये जा करताना मोठा त्रास होत आहे. सदरील रस्ता हा तत्कालिन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नातून हा रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र रस्त्याचा दर्जा हा अत्यत निकृष्ट बनवला गेला असून यावर कालांतराने खड्डे पडले. या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली होती मात्र दुरुस्ती नंतर ही पुन्हा खड्ड्यांनी आपले साम्राज्य निर्माण केले आहे. नागरिकांनी लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अरुण गित्ते