दहा तासात दरोडेखोर जेरबंद

दौंड, दि. ३० ऑगस्ट २०२०: पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद (ता. दौंड) येथे दोन दुचाकीवरून आलेल्या पाच चोरटयांनी टेंम्पोतील ३० लाख रूपये लुटल्याप्रकरणी पोलिसांना दहा तासात एका आरोपीसह, १० लाख रूपये व एक दुचाकी ताब्यात घेण्यात यश आले.
मळद येथील वृंदावन हाॅटेलजवळ शनिवारी ( ता. २९ ) रात्री आठ वाजता महामार्गावरून सोलापूरकडे जाणाऱ्या टेंम्पोतून दोन काळया रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या पाच चोरटयांनी ३० लाख रूपये पळवले होते. याबाबत दौंड व यवत पोलिसांनी सुरक्षायंत्रणेवर त्वरित माहिती देऊन मदतीचे आवाहन केले. त्यामुळे ग्रामस्थ व ग्रामसुरक्षा दल सतर्क झाले. पाटस येथील ग्रामस्थ राहील तांबोळी यांच्या सांगण्यावरून  पाटस – बारामती रस्त्यालगत एक दुचाकी व ८ लाख २० हजार रूपये रोकड सापडली. रविवारी ( ता. ३० ) पहाटे पोलिस हवालदार बाळासाहेब पानसरे व पोलिस मित्र सोनबा देशमुख यांना पाटस टोलनाक्यावरील एका हाॅटेलमध्ये एक संशयित आरोपी प्रकाश पांडुरंग गोरगल (वय ३६, रा. वाखारी, ता. दौंड  ) याला व त्याच्याकडील २ लाख १० हजार रूपयांची रोकड ताब्यात घेतली.
पाटस पोलिसांनी दहा तासात एक दुचाकी, दहा लाख ३० हजार रूपये व एका आरोपीला अटक करण्यात यश आले. तर उर्वरित चार आरोपी व पैशाचा तपास चालू आहे. अटक करण्यात आलेला आरोपी व मुद्देमाल दौंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील महाडिक करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा