संगमनेरात भगव्या मोर्चाने झाले सर्वत्र भगवे वातावरण; घोषणांनी परिसर दणाणून गेला

संगमनेर, ६ जून २०२३ : विघातक प्रवृत्ती आणि लव्ह जिहादच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी संगमनेरात सकल हिंदू समाजाच्या वतीने भगवा मोर्चास सुरुवात झाली आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या हिंदू समाज बंधू-भगिनींच्या घोषणांनी परिसर दणाणला. संगमनेर नगरपालिकेजवळील लाल बहादुर शास्त्री चौकात आज सकाळी डोक्यावर भगवी टोपी परिधान करून तसेच गळ्यात भगवी शाल घालून, हातात भगवा ध्वज घेऊन मोर्चात तरुण व तरुणींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

सर्वजण ‘भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, गोमाता की जय, लव्ह जिहाद कायदा झालाच पाहिजे, धर्मांतर विरोधी कायदा झालाच पाहिजे, श्रद्धा झाली साक्षी झाली आता कुणाचं नाव’ या घोषणांनी संगमनेरकर चांगलेच दणाणून गेले आहे. या मोर्चाला लाल बहादुर शास्त्री चौकातून प्रारंभ झाला तर प्रांताधिकारी कार्यालयांवर जाऊन धडकला. मोर्चामध्ये कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शहरांतून हिंदू समाज बांधवांचा भगवा मोर्चा निघणार असल्यामुळे सर्व व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे शहर आणि तालुक्यातील विविध गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला आणि गावाची गावे या भगव्या मोर्चात सहभागी झाले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा