सासवडची बाजारपेठ उद्यापासून नऊ ते पाच दरम्यान होणार सुरू

पुरंदर, दि. २९ जून २०२०: पुरंदर तालुक्यातील तालुक्याचे शहर असलेल्या सासवड शहरातील बाजारपेठ गेली सात दिवस बंद आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू न करण्याने पसंत केले होते. आज व्यापारी आणि प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत उद्यापासून नऊ ते पाच या वेळेत ही दुकाने सुरू होणार आहेत.

पुरंदर तालुक्यामध्ये सासवड मधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. सात दिवसापूर्वी दिनांक २३ जुनं रोजी सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जवळ यांनी चार दिवस जनता कर्फु पाळण्याचे आवाह केले होते. त्यानंतर ही शहरात वेगवेगळ्या भागांमधून पॉझिटिव्ह रुग्ण वाढतच गेले आणि आज अखेर सासवडमधील दुकाने बंद राहिली. यामुळे सासवडकर नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली होती. दुकाने बंद असल्यामुळे लोकांना किराणा आणि इतर साहित्य मिळेनासे झाले होते. त्यातच कोरोनाचे वाढते रुग्ण यामुळे बाजारपेठ सुरू होईल की नाही याबद्दल लोकांच्या मनामध्ये चिंता वाढली होती.

मात्र आज पुरंदर तालुक्याचे आमदार संजय जगताप, तहसीलदार रूपाली सरनोबत, सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक व व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत उद्यापासून दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सोशल डिस्टन्स पाळणे, प्रत्येकाने तोंडाला मास्क बांधणे, सॅनिटायझरचा वापर करणे ही याची खबरदारी घेत दुकाने सुरू होणार आहेत. कोणत्याही प्रकारची गर्दी होऊन रोगचा प्रसार होनार नाही याबाबतची काळजी घेण्यात येणार आहे. सासवड शहर हे पुण्याला लागून असलेले शहर आहे. त्यामुळे लॉकडाऊन उठल्यावर लोकांचे पुण्याला येणे जाणे वाढले होते. या लोकांना कोरोनाची लागण झाली आणि त्या लोकांचा शहरातील लोकांचे संबंध आल्यामुळे त्याचा प्रसार शहरात झाला. आता यापुढे सुद्धा लोक काळजी घेतील का ? आणि याचा प्रसार थांबेल का याबाबत लोकांच्या मनामध्ये शासंकता आहे. तसेच एक प्रकारची भीती अजूनही लोकांच्या मनामध्ये आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा