सुरेंद्र मोहन पाठक यांच्या पुस्तकाचं दृश्य मिर्जापूरमधून काढलं जाणार

नवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर २०२०: गुन्हेगारावर आधारित कादंबऱ्या लिहिण्यासाठी जगभरातील प्रसिद्ध लेखक सुरेंद्र मोहन पाठक यांचं ‘धब्बा’ हे पुस्तक मिर्झापूर या वेब सिरीज मध्ये एका सीनमध्ये दाखवण्यात आलं आहे. परंतु, सुरेंद्र मोहन पाठक याबद्दल नाराज आहेत कारण की, त्यांचं असं म्हणणं आहे की वेब सिरीज मध्ये त्यांचं पुस्तक धब्बा वेगळ्या पद्धतीनं परिभाषित केलं आहे, ज्यामुळं त्यांच्या पुस्तकाची प्रतिमा व त्यांच्या स्वतःच्या प्रतिमेला देखील इजा पोहचली आहे. सुरेंद्र यांनी प्रॉडक्शन हाऊसला इशारा दिला की जर ते दृश्य मालिकेतून हटवलं नाही तर ते मिर्झापूर वेब सिरीजवर कायदेशीर कारवाई देखील करू शकतात. तथापि, मालिकेतून आता हा सीन हटविण्यात आला असून प्रॉडक्शन हाऊसनं लेखकाची माफी मागितली आहे.

मिर्जापूर २ च्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत. एकीकडं मिरजापूरचा हा नवीन सीझन आवडला जात असताना दुसरीकडं ही वेब सीरिज वादाचा एक भाग असल्याचं दिसतेय. या वेब सीरिजमध्ये एक सीन आहे ज्यात कुलभूषण खरबंदा यांनी आपली सत्यनंद त्रिपाठीची भूमिका साकारली आहे आणि सुरेंद्र मोहन पाठक यांचं पुस्तक ‘धब्बा’ हातात धरलं आहे. सुरेंद्र मोहन पाठक यांनी या पुस्तकाच्या कथानकानुसार जे बोलले त्यावर आक्षेप घेतला आणि ते काढून घ्यावेत अशी मागणी केली.

यानंतर एक्सेल एन्टरटेन्मेंटनं वेब सीरिजमधून ते दृश्य काढून टाकलंच, शिवाय सोशल मीडियावरील एका पत्राद्वारे लेखकाची क्षमा मागितली. पत्रात असं म्हटलं होते की, प्रिय सुरेन्द्र मोहन पाठक, आम्ही या चुकीबद्दल दिलगीर आहोत आणि आम्ही हे देखील स्पष्ट करू इच्छितो की कोणत्याही प्रकारे आपली प्रतिमा दुखविण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्ही या गोष्टीशी सहमत आहोत की आपण हिंदी प्राइम फिक्शनचे एक मोठे लेखक आहात आणि आपल्या कार्याचं कौतुक देखील केलं जातं.

तीन आठवड्यांचा मागितला वेळ

पत्रात पुढं असंही म्हटलं आहे की- आपल्या इच्छेनुसार हे दृश्य आमच्या बाजूनं काढून टाकलं गेलं आहे ही माहिती आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. आम्ही या सीन मधून पुस्तकाचं मुखपृष्ठ अस्पष्ट करू आणि ३ आठवड्यांत आवाज काढून टाकू. कृपया या चुकीबद्दल आम्हाला क्षमा करा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा