मुंबई ६ जुलै २०२१ : अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपचे १२ आमदार निलंबित झाल्यानंतर आज दुस-या दिवशी भाजप आक्रमक झाले आहे. त्यानी आज प्रतिअधिवेशन भरवले. एकुणातच आजचा दिवस शाब्दिक चकमकीत जाणार की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भास्कर जाधव यांनी आज अधिवेशनात विरोधकांच्या विरोधात अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी विरोधकांचा स्पीकर जप्त करण्याची मागणी केली. तसेच विरोधकांनी सभागृहात असणं अपेक्षित आहे. मात्र त्यांनी आपल्या वर्तनाचा विचार करावा. कारण महाविकास आघाडीचं सरकार सगळ्यांना घेऊन कामकाज करतं. कुठलेही हेवेदावे करत नाही. असंही त्यांनी नमूद केलं.
यावेळी त्यांना सपोर्ट करताना भास्कर जाधवांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून धमक्या येत आहे. त्यांना संरक्षण मिळणे, गरजेचे असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं. भास्कर जाधव यांच्या जिविताची काळजी पाहता ती सुरक्षा त्यांना मिळेल, असं गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस