शिंदे गट होतोय पॉवरफुल …

पुणे, १६ जुलै २०२२: बंडखोर आमदार शिंदे गटात गेले आणि शिंदे गटाचं वेगळं अस्तित्व निर्माण झालं. ५० आमदारांना मिळून हा गट निर्माण झाला. पण त्यामुळे आता शिंदे गट हा पॉवरफुल गट म्हणून गणला जात आहे. शिवसेना फुटली असं म्हणत शिवसेनेला भगदाड पडले. पण आता हाच शिंदे गट पॉवरफुल म्हणजेच बलाढ्य होताना दिसत आहे.

शिवसेनेतून नुकतीच विजय शिवतारे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाविरोधात कारवाई केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे आता त्यांनी शिंदेगटाचा आसरा घेण्याचं ठरवलं आहे.
रत्नागिरीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. २३ नगरसेवकांपैकी २० नगरसेवकांनी शिंदेगटात प्रवेश केला आहे. त्यांनी उदय सामंत यांना पाठिंबा जाहीर करुन त्यांची भेट घेतली. त्यामुळे आता रत्नागिरीतून शिवसेनेचा पाठिंबा जवळजवळ निघून गेला आहे.

पालघरमध्येही शिवसेना तुटताना दिसत आहे. त्यात आमदार, खासदार यांच्याबरोबर पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदेगटाला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे जिथे शिवसेना बलाढ्य होती तिथे शिवसेना सर्वात कमजोर होताना दिसत आहे.

या आधी नारायण राणे, छगन भुजबळ, आणि राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्याची मोठी उदाहरणे समोर आहेत. पण शिवसेनेने महाविकास आघाडीबरोबर युती केल्यानंतर शिवसेनेतील आमदारांची गळचेपी होत होती. आणि म्हणून त्यांनी बंड केले, असे समोर आले आहे.
पण आता शिवसेनेने अर्थात पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. जिथे शरद पवार स्वत: पुन्हा एकदा एकत्र निवडणूक लढवण्याचे संकेत देत असताना, त्यांच्याबरोबर जाणं योग्य की अयोग्य हा निर्णय घेऊन पक्ष वाचवण्याचं महत्त्वाचं काम उद्धव ठाकरेंनी करावा, असा कयास उरलेले आमदार करत आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरेंची निर्धार यात्रादेखील किती प्रभाव पाडू शकते, हे पहाणं उचित ठरेल. पण तोपर्यंत शिवसेनेचे काय होणार हा प्रश्न मात्र जनमानसात नक्कीच पडलेला दिसत आहे. हे मात्र खरं.

न्यूज अनक्ट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा