गोल पोस्ट राष्ट्रीय ‘परिणीती भाभी झिंदाबाद’ च्या घोषणांनी दणाणले मोहाली स्टेडियम.

‘परिणीती भाभी झिंदाबाद’ च्या घोषणांनी दणाणले मोहाली स्टेडियम.

मोहाली पंजाब ४ मे २०२३ : बुधवारी मोहालीत मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात रंगलेला सामना पाहण्यासाठी अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा एकत्र पोहोचले होते. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची आणि त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सध्या सुरू असताना दोघेही मॅचचा आनंद घेण्यासाठी स्टेडियम वर पोहचले. त्यांना पाहताच त्यांच्या काही चाहत्यांनी स्टेडियममध्ये ‘परिणीती भाभी झिंदाबाद’ च्या घोषणा द्यायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात ‘परिणीती भाभी झिंदाबाद’ च्या घोषणांनी मोहाली स्टेडियम दणाणून गेले.

या बाबत समोर आलेल्या एका व्हिडिओत परिणीती आणि राघव स्टेडियम मध्ये आपल्या चाहत्यांना नमस्कार करताना आणि हात हलवून अभिवादन करताना दिसत आहेत. यावेळी परिणीती ब्लॅक ड्रेसमध्ये तर राघवदेखील ब्लॅक कलरच्या शर्टमध्ये दिसले. चाहत्यांच्या ‘परिणीती भाभी झिंदाबाद’च्या घोषणांनी परिणीती आणि राघव दोघे चकीत झाले.

येत्या १३ मे रोजी दोघांचा दिल्लीत साखरपुडा असल्याची जोरदार चर्चा आहे. पण अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. खरं तर गेल्याच महिन्यात १० एप्रिल रोजी दोघे साखरपुडा करणार असल्याची चर्चा होती. पण गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीच्या आरोपपत्रात राघव यांचे नाव आल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. दोघेही जवळपास मागील सहा महिन्यांपासून एकत्र आहेत. राघव हे पंजाबमधील भगवंत मान सरकारचे मुख्य सल्लागार आहेत.

परिणीती आणि राघव अद्याप त्यांच्या नात्याविषयी मौन बाळगून आहेत. पण त्यांच्याशी संबंधित अनेकांनी त्यांच्या नात्याला दुजोरा दिला आहे. दोघेही एकमेकांना पसंत करतात आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या नात्याला समंती दर्शवली आहे असे कळते. दरम्यान आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोरा यांनी नुकतेच त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिल किे, मी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही आनंदी राहा,तुम्हाला शुभेच्छा. या ट्वीटने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

error: Content is protected !!
Exit mobile version