बारामती (मुर्टि),दि. २० मे २०२०: बारामतीत १३ वा तर तालुक्याच्या भागातील सहावा कोरोनाचा रुग्ण आज आढळून आला आहे. तालुक्यातील मुर्टि येथील रुग्णाच्या मुलाला कोरोना संसर्ग झाला आहे. त्याच्यावर बारामती येथील रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. मुर्टि
येथील रुग्ण मुंबई येथून त्याच्या घरी आला होता. त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे १८ मे रोजीच स्पष्ट झाले आहे. या कोरोना संक्रमित रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील ९ व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती.
बारामती तालुक्यातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांच्या कुटुंबातील लोकांची कोरोना चाचणी केली होती यामध्ये रुग्णाच्या मुलाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तर इतर व्यक्तींची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या सहावर तर बारामतीत एकुण संख्या १३ वर जाऊन पोहचली आहे.
नागरीकांनी लॉकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. अत्यावश्यक व गरजेच्या
कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच, सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटाझरचा वापर करणे देखील महत्वाचे असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले.
शहरात श्रीरामनगर,समर्थनगर म्हाडा वसाहत परिसरसह तालुक्यात माळेगाव, कटफळ, मुट्टी, वडगांव निंबाळकर येथे आजपर्यंत एकुण १२ सापडले निबाळकर येथे आजपर्यंत एकुण १३ जण आहेत. तसेच दोघाजणांचा कोरोनामुळे मृत्यू आला आहे. तसेच आज बारामतीचे एकाच कुटुंबातील सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव