मुंबई:दि. ३१ मे २०२०: काल (३० मे) रोजी उद्धव ठाकरे यांनी पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केली, हे लॉकडाऊन ३० जून पर्यंत लागू असणार आहे. २४ मार्च पासून देशभरात आणि राज्यभरात लागू करण्यात आलेल्या लोकडाऊनचा टप्पा एकामागे एक वाढत पाच पर्यंत पोहचला आहे. परंतू हे लॉकडाऊन घोषित झाले असले तरी नागरिकांच्या मनामध्ये सवलती बाबत संभ्रम निर्माण झाला होता. अर्थातच या पाचव्या लोकडाऊन मध्ये सवलती मध्ये वाढ करण्यात येणार होती. त्या योगाने आज उद्धव ठाकरेंनी पाचव्या लॉकडाऊन विषयी नियमावली जाहीर केली आहे.
महाराष्ट्र सरकारने घोषित केलेल्या नवीन नियमावलीची वैशिष्ट्ये:
या नवीन नियमावलीमध्ये कंटेंनमेंट झोनमध्ये कोणतीही शिथिलता नाही. मुंबई आणि एमएमआर रिजनमधील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.
नवीन नियमावलीमध्ये काही शिथिलता देण्यात आली आहे. परंतु ही शिथिलता टप्प्याटप्प्याने देण्यात आली आहे. ३, ५ आणि ८ जून असे टप्प्याटप्प्यात ही नियमावली लागू होणार आहे.
पहिला टप्पा, ३ जून;
मुंबई आणि एमएमआर रिजनमधील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट
• यात संचारबंदी सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सूट
• घोळक्याने एकत्र जमा होण्यास बंदी
• शारीरिक कसरतीसाठी काही वेळ बाहेर पडण्यास परवानगी, यासाठी जवळच्या मोकळ्या जागांचा वापर करता येणार, दूर जाण्यास मनाई
दुसरा टप्पा, ५ जून:
• मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळून सर्व मार्केट, दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी, यासाठी सम आणि विषम फॉर्म्युला वापरणार, सम तारखेला एका रस्त्यावरील दुकाने तर विषम तारखेला समोरच्या रस्त्यातील दुकाने खुली राहणार
• कपड्याची दुकाने सुरू राहणार मात्र कपड्याच्या दुकानातील चेंजिंग आणि ट्रायल रुम बंद राहणार
• दुकानात गर्दी होणार नाही याची खबरदारी दुकानदाराने घ्यायची, यासाठी टोकन पद्धत, होम डिलिव्हरीसारखे पर्याय वापरायचे
• खरेदीसाठी लोकांना शक्य असेल तर जवळच्या मार्केटमध्ये चालत,अथवा सायकलने जाण्याच्या सूचना
• अत्यावश्यक वस्तूच्या खरेदीशिवाय इतर वस्तूच्या खरेदीला दूर जाण्यास मनाई
• खरेदीसाठी गर्दी आढळल्यास स्थानिक प्रशासन मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते
तिसरा टप्पा, ८ जून:
• सर्व खाजगी कार्यालयात १० टक्के कर्मचा-यांच्या उपस्थिती चालवण्यास परवानगी, उरलेल्या लोकांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय
• कामाच्या ठिकाणी सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना
• अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी १ चालक १ प्रवासी, रिक्षा १ चालक २ प्रवासी, खाजगी चारचाकी १ चालक २ प्रवासी आणि दुचाकीवर केवळ एकाला प्रवास करण्याची परवानगी
न्यूज अनकट प्रतिनिधी