सामान्य जनतेलाही रेल्वेने प्रवास करु द्यायला हरकत नसल्याचे राज्य सरकारचं उच्च न्यायालयात प्रतिपादन

6

नवी दिल्ली, १० ऑक्टोबर २०२० : रेल्वेच्या फेऱ्या वाढवायला तसेच सुरक्षीत अंतर राखत आणि मास्कचा वापर करत सामान्य जनतेला देखील या रेल्वेने प्रवास करायला आपली हरकत नाही, असे राज्य सरकारने आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले.

सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना केवळ उपनगरी गाड्याने प्रवास करायला परवानगी आहे. कोरोनामुळे सध्या उपनगरी रेल्वेच्या मर्यादीत फेऱ्या सुरू आहेत.

टाळेबंदी शिथिल करतानाच गाड्यांच्या फेऱ्या देखील राज्य सरकारने वाढवायला हव्यात, असे उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने या आठवड्याच्या सुरवातीला राज्य सरकारला निर्देश दिले होते.

त्यावर राज्य सरकारने आज आपली बाजू न्यायालयात मांडली. फेऱ्या वाढवण्या बाबत रेल्वे मंडळाला प्रस्ताव पाठवल्याचं देखील राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा