शरद पवारांसंदर्भातील विधान कॉग्रेसचे नाही तर आपले वैयक्तिक ; अलका लांबा यांच्याकडून सारवासारव

नवी दिल्ली, ९ एप्रिल २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उधोगपती गौतम अदानी यांचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकत पवार यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यां अलका लांबा यांनी आता सारवासारव केली आहे. पवार यांच्यासंदर्भात केलेले विधान हे कॉग्रेस पक्षांचे नसून ते आपले वैयक्तिक असल्याचेही लांबा यांनी म्हटले आहे.

आदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमलेली आहे. त्यानंतर आता संयुक्त संसदीय समितीच्या नियुक्तीची आवश्यकता नाही, असे शरद पवार यांनी एका खाजगी वाहिनीवर बोलताना म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या नेत्यां अलका लांबा यांनी ‘भित्रे स्वार्थी’ लोक स्वतःच्या हितासाठी हुकूमशाही सत्ताधीशांचे गुणगान गात आहेत. राहुल गांधी एकटे जनतेसाठी लढाई लढत आहेत. हे भांडवलदार चोर आणि चोरांना संरक्षण देणाऱ्या चौकीदाराशीही लढत आहेत. अशी टिका केली होती.

अलका लांबा यांनी केलेले वक्तव्य काँग्रेसचे अधिकृत वक्तव्य मानायचे काय? असा सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आला होता. यावर लांबा यांनी ते विचार कॉग्रेसचे नसून आपले वैयक्तिक असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान लांबा यांनी शरद पवारांसंदर्भात केलेल्या टिप्पणीची राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा