६८ व्या राष्ट्रीय पुरस्काराची गोष्ट एका पैठणीची वर मोहोर….

पुणे, २२ जुलै २०२२: ६८ व्या राष्ट्रीय पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यात मराठी चित्रपट “गोष्ट एका पैठणीची” या चित्रपटाने बाजी मारली असून अभिनेत्री सायली संजीव हिची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे.

विशेष पुरस्कारांमध्ये गोदाकाठ आणि अवांछित यांनी पुरस्कार पटकावले. मी वसंतराव देशपांडे या चित्रपटाच्या पार्श्वगायनासाठी राहुल देशपांडे यांना उत्कृष्ठ गायक म्हणून पुरस्कार मिळाला.
तर किशोर कदम अर्थात सौमित्र यांना स्पेशल ज्युरी म्हणून विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तान्हाजी या बॉलिवूड चित्रपटासाठी अजय देवगणला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. १२३२ किलोमीटर मारेंगे तो वही जांकर , यासाठी विशाल भारद्वाज यांना सर्वोत्कृष्ठ संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.

विशेष उल्लेखनीय पुरस्कारांमध्ये उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड यांना मोस्ट फिल्म फ्रेंडली या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यामुळे पुन्हा एकदा मराठी आणि हिंदी चित्रपटांनी भारताची मान उंचावली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा