बारामती, १४ फेब्रुवरी २०२१: पुणे येथील आपटे प्रशालेच्या शारदा बालक विहार यांनी ऑनलाईन विविधांगी अयोजीत केलेल्या स्पर्धेत बारामतीच्या महात्मा गांधी बालक मंदिरला यश मिळाले आहे.
या स्पर्धेत बाल अभिनय, गीत, गायन स्पर्धेमध्ये महात्मा गांधी बालक मंदिर येथील शिक्षीका उज्ज्वला पुरंदरे, नयन देशपांडे, निता तावरे, अनिता गायकवाड, राजश्री कळंत्रे, व सीमा भागवत यांनी गाण्याचा व्हिडिओ करून सहभाग घेतला होता. नयन विनायक देशपांडे यांना स्वरचित अभिनय गीत गायना मध्ये द्वितीय क्रमांकाचे पारीतोषिक जेष्ठ कवी हिमांशु कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी शारदा बालक विहार चे अध्यक्ष अभय आपटे, सदस्य डाॅ. देशमुख, जयप्रकाश बुट्टेपाटील व संस्थेचे महामात्र उपस्थित होते. संस्थेच्या व शाळेच्या संकुला तर्फे विजेत्या स्पर्धकांचे व सहभागी शिक्षीकांचे अभिनंदन करण्यात आले.
न्युज अन कट प्रतिनिधी: अमोल यादव