नीरेत पोलीस आल्याने संशयीत चोर मोटारसायकल सोडून पळाले

पुरंदर, दि.११ नोव्हेंबर २०२०: हिवाळ्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असते, त्यामुळे जेजुरी व नीरा पोलिसांनी रात्र गस्त वाढवली आहे. दि. १० रोजी पहाटे नीरा पोलीस गस्त घालत असताना मोटारसायकल फिरणारे तीघे संशयित हलचाल करत असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी त्यांना हटकले असता ते मोटारसायकल सोडून पळून गेले. हे तीघेही चोर असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत नीरा (ता.पुरंदर) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथे रात्री नाइट राऊंडला नीरा येथील स्मशानभूमी जवळ रात्री दीड ते दोनच्या दरम्यान पोलिस रात्र गस्त घालत असताना नीरा वॉर्ड न.१ येथे तीन इसम संशयितरित्या फिरत असताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता ते पळून गेले. संशयित मोटारसायकल मिळून आली आहे. टि.व्हि.एस कंपनीची मोटारसायकल क्र. एम.एच.४२ ए.जे.- ५२२५ ही मोटारसायकल सोडून संशयित चोरटे पळून गेले आहेत. पोलिस हवालदार सुदर्शन होळकर, पोलिस नाईक राजेंद्र भापकर, पोलिस कॉन्स्टेबल नीलेश जाधव, होमगार्ड तारू व शिंदे यांच्या सतर्कतेमुळे चोरीचा अनर्थ टळला.

सुनिल महाडिक: पोलीस निरीक्षक जेजुरी

“गावातील ग्रामस्थांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर करावा, चोऱ्या, दरोडे किंवा अकस्मीत काही घटना घडल्यास ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत तातडीने संदेश द्यावा”. असा संदेश आल्यावर ग्रामस्थांनी तातडीने संबंधितांना मदत करावी सुट्टी निमित्त परगावी जायचे असल्यास मौल्यवान ऐवज बँक लाँकर किंवा सुरक्षीत ठिकाणी ठेवावेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा