ठाकरे सरकारनं लतादीदींना वाढदिवसाची दिली ”ही” भेट 

मुंबई, २८ सप्टेंबर २०२०: भारताची कोकिळा म्हणून ओळख असणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज ९१ वा वाढदिवस आहे. लतादीदींना देशभरातून शुभेच्छा येतायत. अशातच ठाकरे सरकारनं लतादिदींना त्यांच्या वाढदिवशी एक घोषणा करत अनोखी भेट दिली आहे. राज्य सरकार मुंबईत ”मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालयाची” स्थापना करणार आहे. याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट केलं की, ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने माझ्या विभागामार्फत गानसम्राज्ञी लता दिदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय स्थापन करणार.”

”येत्या काही दिवसांमध्ये मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय सुरू केलं जाईल. संगीतामधला मंगेशकर कुटुंबियांचा जो वारसा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गायक, अनेक वादक या संगीत महाविद्यालयातून तयार होतील, याची पूर्ण खात्री या विभागाचा प्रमुख म्हणून मला खात्री आहे.’ असंही उदय सामंत म्हणाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा