हडपसरमध्ये संचार बंदीच्या काळात तिसरा खून

हडपसर : हडपसर येथे आज (दि.२६) रोजी बसू उर्फ बसवराज भीमराव कांबळे (वय २७ वर्षे, रा अष्टविनायक कॉलनी, गंगानगर, फुरसुंगी) याच्या डोक्यात मोठा दगड घालून अज्ञात आरोपींनी निर्घृण खून केला. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईला कामाला सोडवण्यासाठी तो सकाळी साडेसात वाजता आपल्या घरातून निघाला. आईला कामावर सोडून पुन्हा परत घराकडे येत असतानाच घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गंगानगर स्मशानभूमी येथील रोडवरच त्याला अज्ञात इसमांनी अडवले. त्याला त्याच्या दुचाकीवरून खाली पाडून त्याच्या डोक्यात मोठ्या दगडाने वर्मी घाव घातला व निर्घृण खून केला. बसवराज याच्यावर यापूर्वीही हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

संचारबंदीच्या काळातील हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हा तिसरा खून आहे. ऐन संचारबंदीमध्येच गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्वामधून फुरसुंगी परिसरात खुनाचे सत्र सुरूच आहे. प्रवीण नाईकनवरे, शोएब शेख, यानंतर आता बसवराज कांबळे याचा फुरसुंगी परिसरात निर्घृण खून झाला आहे. बसवराज कांबळे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते व त्यांना एक एक वर्षेचा मुलगा आहे. आई फातिमानागर येथील सोसायटीमध्ये घरकाम करत होती. मृत बसवराज तेथे साफसफाई काम करायचा काही दिवसांपूर्वी येथे प्रवीण नाईकनवरे याचा खून झाला होता, यातून येथे वर्चस्व वाद सुरु होता बसवराज वर संशय होता. व पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशन करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा