जिनेवा, १६ जुलै २०२१: जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) जगात कोरोनाची तिसरी लाट सुरू होण्याची घोषणा केली आहे. संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस गेब्रेयसियस यांनी बुधवारी देशांना असा इशारा दिला की, ते कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात दाखल झाले आहेत. फक्त लस घेतल्यानं महामारी थांबवता येणार नाही. जगातील देशांनी याला सामोरं जाण्यासाठी तयारी करावी. तर बर्याच देशांनी हे देखील दर्शविलं आहे की हा विषाणू थांबविला जाऊ शकतो.
त्याबरोबरच या धोका भारतातही दिसून येतो. डेल्टा प्रकार आणि व्हायरसच्या उत्परिवर्तनाची (म्यूयूटेशन) प्रकरणे वाढल्यामुळं देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती लवकरच वास्तवात बदलू शकते, असा इशारा एका परदेशी संस्थेनं दिला आहे.
दहा आठवड्यानंतर मृत्यू दरात पुन्हा वाढ
यूएन न्यूजच्या वृत्तानुसार, कोरोना प्रकरणे आणि मृत्यूंमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीबद्दल आरोग्य तज्ज्ञांनी चेतावणी दिलीय. युरोप आणि उत्तर अमेरिकेत लसीकरण कव्हरेज वाढल्यामुळे यात घट झाली आहे. युनायटेड नेशन्सच्या मीडिया विंगचे म्हणणे आहे की सलग चौथ्या आठवड्यात जगभरात कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झालीय. दहा आठवड्यांच्या प्रकरणांमध्ये मृत्यूंमध्येही पुन्हा वाढ होऊ लागली आहे.
डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले की, व्हायरस सतत बदलत असतो. यासह, तो अधिक संसर्गजन्य होत आहे. त्यांनी सांगितलं की, डेल्टा प्रकार आता डब्ल्यूएचओच्या सर्व ६ क्षेत्रांमध्ये आणि १११ पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचला आहे. हा लवकरच जगभर पसरेल. व्हायरसचा अल्फा प्रकार १७८ देशांमध्ये, १२३ देशांमध्ये बीटा आणि ७५ देशांमध्ये गॅमा आढळला आहे.
ब्राझीलमध्ये जगात सर्वाधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. गेल्या २४ तासांत त्यांची संख्या ५७ हजाराहून अधिक होती. गेल्या आठवड्यात येथे ३.४९ लाख प्रकरणे आढळली. तथापि, येथे नवीन प्रकरणांमध्ये १४% घट झालीय. या काळात इंडोनेशियात ४५%, ब्रिटनमध्ये २८%, अमेरिकेत ६७%, स्पेनमध्ये ६१% प्रकरणे वाढली आहेत.
दक्षिण पूर्व आशिया प्रदेशात मृत्यूच्या बाबतीत भारत आघाडीवर आहे. भारतात ६ हजार नवीन मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ इंडोनेशिया आणि बांगलादेशचा क्रमांक लागतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे