शिवरी फाटा येथे ट्रकने दुचाकीस्वाराला ठोकरले

पुरंदर, २७ ऑक्टोबर २०२०: पुरंदर तालुक्यातील पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील शिवरी येथील वळणावर वीट वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वाराला ठोकरले. दुचाकीस्वाराला ट्रकचालकाने समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला आहे. दुचाकी ट्रकच्या पुढच्या चाकाखाली येऊन दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले. मात्र दैवबल्लवत्तर म्हणून दुचाकीस्वार थोडक्यात बचावला.

पालखी मार्गावरील सासवड जेजुरी दरम्यानच्या रस्त्यावरील शिवरी येथील धोकादायक वळणावर बांधकामाच्या विटांची वाहतूक करणारा टाटा एस हा अवजड वाहतूक ट्रक (एम.एच.२०-ए-६८४६) ने दुचाकीस्वार होंडा शाईन (एम.एच.११-बी.डब्लू-३९२९) यांच्या मध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये मोटार सायकलचा  चुराडा झाला आहे.

प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार विटांची वाहतूक करणारा ट्रक शिवरी गावातून पालखी मार्गावर येत असताना पालखी मार्गावरुन फलटण येथून सासवडकडे निघालेला युवक दुचाकीस्वार यांच्यामध्ये जोरदार धडक झाली. राहुल नलवडे (रा. फलटण) हा युवक यादरम्यान जखमी झाला आहे. तो सासवड येथील फायनान्स कार्यालयात सेवेत आहे. त्याच्या डाव्या पायाल गंभीर जखम झाली असून स्थानिक युवकांनी तात्काळ मदतकार्य करत जखमी युवकाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा