मुंबई, ७ ऑगस्ट २०२०: “तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेने संपुर्ण भारतीयांवर आपल्या मनोरंजनाने भुरळ पाडली आहे.देशात या मालिकेला न ओळखणारे नाही च्या बरोबरीने सापडतील.पण आलिकडच्या काळात अनेक धक्के या मालिकेला बसलेले पहायला मिळत आहे.ज्याचा परिणाम हा त्यांच्या प्रेक्षक वर्गावर ही होताना दिसतोय.
“तारक मेहता का उल्टा चश्मा” हि मालिका १२ वे वर्ष लवकरच साजरे करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने स्वत:चा एक वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे. तर दिशा वकानी अर्थात दयाबेन ने या कार्यक्रामातून एक्झिट घेतल्याने मालिकेची TRP हि थोडीशी डगमगली परंतु यामुळे मालिकेला जास्त फरक पडत नाही असे निर्माता असित कुमार मोदी यांनी सांगितले.
दयाच्या जाण्यानंतर हळूहळू एक एक कलाकार हे मालिकेतून कमी होताना दिसत आहेत. दयाच्या आधी टपूने मालिका सोडली, तर सोनू (भिडेची मुलगी) पात्र देखील सारखे बदलत आहेत.तर डाॅ हाथी यांच्या अकाली जाण्याने मालिकेत जुने पात्र कमी होण्याचे सत्र सुरु आहे.आता याच पार्श्वभूमीवर आणखी दोन कलाकार ही मालिका सोडून जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आणि ते म्हणजे अंजली मेहता(नेहा मेहता) आणि रोशन सिंग सोढी(गुरुचरण सिंग सोढी) यांनी मालिका सोडल्याचे वृत्त येत आहे.
अंजली मेहता(नेहा मेहता) यांनी मालिका सोडल्याची बातमी एन्टरटेनमेंट वेबसाइट स्पॉटबॉयने दिली.तर रोशन सिंग सोढी(गुरुचरण सिंग सोढी) सोडून जाण्याच्या बातमीचे निर्माता ने खंडन केले आहे.
“तारक मेहता का उल्टा चश्मा” शो मधून असे कलाकार निघून जाण्यानें त्यांच्या प्रेक्षक वर्गाला मोठा धक्का बसला आहे. तर त्या बरोबरच पुढे मालिकेवर देखील याचा खराब परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी