दोन राज्यात विभागले आहे हे रेल्वे स्टेशन, अर्धे महाराष्ट्रात तर अर्धे गुजरात

नवापूर, दि. ६ जुलै २०२० : भारतीय रेल्वेचा खूप जुना इतिहास आहे. भारतीय रेल्वे विषयी अनेक रंजक गोष्टी आहेत ज्या बहुतांश लोकांना ठाऊक देखील नाहीत. काय आपल्याला याविषयी माहित आहे का कि देशामध्ये एक असे रेल्वेस्टेशन आहे, जे दोन राज्यांच्या सीमेवर बसलेले आहे व दोन्ही राज्यांमध्ये स्थित आहे. वास्तविक, ‘नवापूर’ रेल्वे स्टेशन पश्चिम रेल्वेच्या सूरत-भुसावळ सीमेवर आहे. हे रेल्वे स्टेशन दोन्ही राज्यांमध्ये विभागले गेले आहे. नवापूर रेल्वे स्टेशनचा एक भाग महाराष्ट्र मध्ये आहे तर दुसरा भाग गुजरात मध्ये आहे.

विशेष म्हणजे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील या स्टेशन विषयी माहिती आपल्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट करून दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये पियुष गोयल म्हणाले की, “काय आपल्याला हे माहीत आहे का की देशांमध्ये एक असे रेल्वेस्टेशन आहे जे दोन राज्यांमध्ये विभागले गेलेले आहे? सुरत भुसावळ सीमेवर नवापूर हे असेच एक स्टेशन आहे ज्या स्टेशनच्या मधून दोन राज्यांची सीमा जाते. यामुळेच या स्टेशनचा अर्धा भाग महाराष्ट्र मध्ये आहे तर दुसरा अर्धा भाग गुजरात मध्ये आहे.”

जेव्हा नवापूर स्टेशन बांधले गेले तेव्हा महाराष्ट्र व गुजरातचे विभाजन नव्हते. त्यावेळी नवापूर स्टेशन संयुक्त मुंबई प्रांताच्या अखत्यारीत होते. जेव्हा मुंबई प्रांताचे विभाजन झाले तेव्हा नवापूर स्टेशन महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांत विभागले गेले. तेव्हापासून या स्थानकाची स्वतःची वेगळी ओळख आहे.

नवापूर रेल्वे स्थानकात दोन राज्यात विभागलेल्या रेल्वे प्रवाशांना चार वेगवेगळ्या भाषांमध्ये माहिती दिली जाते. घोषणा हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि मराठी भाषेत होते, जेणेकरुन महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना ते सहज समजू शकेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा