गोल पोस्ट इतर राजकारण विरोधी पक्षांची ‘एकजूट’ बैठक पडली लांबणीवर ! आता २३ जूनला होणार चर्चा

विरोधी पक्षांची ‘एकजूट’ बैठक पडली लांबणीवर ! आता २३ जूनला होणार चर्चा

उत्तर प्रदेश, ५ जून २०२३ : भाजप विरोधी पक्षांच्या एकजूटीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार सरसावले आहेत. यासाठी त्यांनी प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांबरोबर चर्चाही केली आहे. भाजपविरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी १२ जून रोजी पाटणा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार होती. मात्र ही बैठक लांबणीवर पडली आहे.

काँग्रेसने स्पष्ट केले होते की, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि पक्षाचे नेते राहुल गांधी या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. यासंदर्भात पक्षांचे संपर्क प्रभारी जयराम रमेश म्हणाले होते की, दोन्ही नेते बैठकीला उपस्थित राहू शकत नसले तरी पक्षाचा एक सदस्य प्रतिनिधी म्हणून बैठकीला उपस्थित असेल. काँग्रेस पक्षाने बैठकीची तारीख पुढे ढकलण्याचे आवाहनही केले होते.

नितीशकुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पार्टी अध्यक्ष अखिलेश यादव, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासह भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली होती. १२ जून रोजी पाटणा येथे होणारी बैठक ही विरोधी पक्षांची एकजुट मजबूत करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. आता ही बैठक २३ जूनला होणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version