हाथरस घटनेनंतरचा व्हिडिओ आला समोर

7

हाथरस, ८ ऑक्टोंबर २०२०: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी सातत्यानं सुरू आहे. दरम्यान, पोलिस तपासणीचा एक व्हिडिओ समोर आला असून सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या दिवशीचा हा व्हिडिओ असल्याचा सांगितलं जात आहे आहे. १४ सप्टेंबर रोजी चित्रित झालेला व्हिडिओ या घटनेनंतरचा आहे. या व्हिडीओमध्ये शेतामधील सामान पडलेलं दिसत आहे. तसंच चार लोकं तिथं उपस्थित असल्याचंही यातून समजत आहे.

१४ सप्टेंबर रोजी पीडितेच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात सामूहिक बलात्काराची घटना घडली. हा व्हिडिओ त्याच दिवसाचा असल्याचा युपी पोलिसांनी दावा केलाय. असंही म्हटलं आहे की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा पीडितेची आई थोड्या अंतरावर होती, अशा परिस्थितीत पीडितेच्या आई पर्यंत आवाज पोहोचू शकला असता.

व्हिडिओमध्ये असं आढळलं आहे की, घटनास्थळी चार व्यक्ती निदर्शनास आल्या, तसेच त्या व्यक्तींच्या चकल्या व इतर सामान देखील तिथं आढळून आलं. या गोष्टी सिद्ध करतात की घटनेच्या वेळी तेथे चार व्यक्ती उपस्थित होत्या. आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर यूपी पोलिस सांगतात की पुरावा म्हणून हा सीबीआय’कडं सोपविला जाईल, जेणेकरून घटनेनंतरच्या परिस्थितीची माहिती तपास एजन्सीला मिळू शकंल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ही घटना घडली होती त्याच वेळेस त्यांना याबाबत तक्रार मिळाली होती. तक्रार मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी दाखल होताच पोलिसांनी हा व्हिडिओ काढला होता. त्यावेळी या सर्व गोष्टी निदर्शनास आल्या होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा