गोल पोस्ट अर्थ उद्योग संपली या नवीन मारुती कारची प्रतीक्षा, फक्त 11,000 रुपयांमध्ये करा बुक

संपली या नवीन मारुती कारची प्रतीक्षा, फक्त 11,000 रुपयांमध्ये करा बुक

पुणे 8 फेब्रुवारी 2022: मारुती सुझुकीने नवीन बलेनोसाठी बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली आहे. हे लोकप्रिय वाहन नवीन नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह येणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. ही मारुती सुझुकीच्या सर्वात लोकप्रिय कारपैकी एक आहे आणि सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे.

याप्रमाणे बुकिंग करता येईल

जर तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या आगाऊ बलेनो बुक करायची असंल, तर तुम्हाला सुरुवातीला 11,000 रुपये जमा करावे लागतील. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यासाठी तुम्हाला तुमच्या घराजवळील मारुती सुझुकी नेक्सा शोरूममध्ये जावं लागंल. मारुती सुझुकी नेक्साच्या वेबसाइटवरूनही तुम्ही ही कार बुक करू शकता.

नवीन कारमध्ये हे आहे विशेष

न्यू एज बलेनोमध्ये हेड अप डिस्प्ले असेल. या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. HUD बसवल्यामुळं, ड्रायव्हरला रस्त्यावरून नजर हटवण्याची गरज नाही. स्पीडोमीटर आणि हवामान नियंत्रणाशी संबंधित महत्त्वाची माहिती डिस्प्लेवर दिसंल. कंपनीचं म्हणणं आहे की, वाहनात बसलेल्या लोकांची सुरक्षितता आणि चालकाची सोय लक्षात घेऊन कारमध्ये नवीन HUD बसवण्यात आलीय. यामुळं वाहनाची तांत्रिक क्षमता आणखी मजबूत होते.

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे ​​वरिष्ठ कार्यकारी संचालक (मार्केटिंग आणि सेल) शशांक श्रीवास्तव यांनी सांगितलं की, या प्रीमियम हॅचबॅकच्या 10 लाखांहून अधिक युनिट्सची आतापर्यंत विक्री झालीय.

नवीन बलेनोबद्दल, श्रीवास्तव म्हणाले, “आजच्या तरुण आणि बोल्ड कस्टमर्सना डेडिकेटेड नवीन पिढीच्या बलेनोची रचना आजच्या टेक-सैवी जेनरेशनला लक्षात घेऊन केली गेली आहे ज्यांना सर्वोत्तम गोष्टी हव्या आहेत. कारमधील सुपीरियर इन-कार टेक्नोलॉजी, एक्सप्रेसिव डिजाइन आणि क्लास लीडिंग सेफ्टी सह, हे शहर-विशिष्ट वाहन आहे जे कारसाठी नवीन बेंचमार्क सेट करते.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version