पुणे, ११ ऑगस्ट २०२२: मारुती सुझुकीची नवीन Alto K10 चे प्री. बुकिंग सुरु झालंय. ती खरेदी करू इच्छिणारे ग्राहक शोरूमला भेट देऊन किंवा ऑनलाइन माध्यमातून कार बुक करू शकतात. अल्टो हे मारुती सुझुकी इंडियाचं सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे.
१८ ऑगस्ट रोजी होऊ शकते लॉन्च
मारुतीची नवीन Alto K10 ११,००० रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते. कंपनी १८ ऑगस्टला लाँच करू शकते. Alto दोन मॉडेल ८०० आणि K10 मध्ये लॉन्च होणार आहे आणि तिचे स्पाय शॉट्स देखील समोर आले आहेत. कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (मार्केटिंग अँड सेल्स), शशांक श्रीवास्तव यांनी अल्टोचा यशस्वी प्रवास सांगताना सांगितलं की, ४.३२ मिलियन ग्राहकांसह अल्टो हा देशातील सर्वात प्रभावशाली ब्रँड आहे.
Alto K10 मॉडेलमध्ये अनेक बदल
मारुतीच्या नवीन अल्टोचं K10 मॉडेल अनेक बदलांसह दिसत आहे. त्याच्या एक्सटीरियरबद्दल बोलायचे झाले तर ते मारुतीच्या सेलेरियोसारखे दिसते. काही दिवसांपूर्वी, कारच्या अॅड शूटदरम्यान अल्टोचे काही फोटो समोर आले होते. यामध्ये, कारच्या रियर-थ्री-क्वार्टरचा अस्पष्ट फोटो दिसत आहे. परंतु, हे पाहता, असं म्हणता येईल की नवीन अल्टो २०२१ च्या उत्तरार्धात लाँच झालेल्या सेकंड जनरेशन सेलेरियोशी अगदी साम्य आहे.
सेलेरियोचे अनेक फीचर्स पाहायला मिळतील
टेल लॅम्प आणि मागील विंडस्क्रीन आणि सी-पिलर हे स्पष्ट संकेत आहेत की नवीन Alto K10 मध्ये सेलेरियोची अनेक वैशिष्ट्ये मिळतील. हे फोटो आल्यानंतर नवीन मारुती अल्टो सध्याच्या पिढीतील अल्टोपेक्षा थोडी मोठी असेल अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Next Generation Alto बद्दल असं सांगितले जात आहे की तिचे बूट स्पेस आणि ग्राउंड क्लीयरन्स देखील जास्त असणं अपेक्षित आहे. मारुतीने BS6 एमिशन नियम लागू केल्यानंतर एप्रिल २०२० मध्ये Alto K10 बंद केली.
इंजिन टू डिझाईन व्हेरिएशन
अल्टोच्या थर्ड जनरेशन मॉडेलची चाचणी देखील मारुती सुझुकी इंडियाने केलीय. कारच्या लीक झालेल्या छायाचित्रांमध्ये चाचणीदरम्यान तिची झलकही पाहायला मिळाली आहे. ज्यावरून हे स्पष्ट होतं की नवीन अल्टोमध्ये इंजिनपासून ते डिझाइनपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. नवीन अल्टो मॉड्युलर हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. सेलेरियो आणि वॅगनआर देखील या प्लॅटफॉर्मसह बाजारात आहेत.
बंपरचे नवीन डिझाइन
लूकच्या बाबतीत मात्र नवीन अल्टो जुन्या मॉडेलशी मिळतीजुळती असेल. पण लीक झालेली छायाचित्रे पाहता बंपरला नवीन डिझाइन देण्यात आले आहे. या बदलामुळं कारच्या लुकमध्ये बदल दिसून येईल. नवीन केबिन सोबत, यात अद्ययावत हेडलॅम्प आणि मागील बाजूस स्क्वेअर-इश टेल लॅम्प दिसतील. याशिवाय, अल्टोला फ्लॅप-प्रकारचे डोअर हँडल आणि पॉवर-ऑपरेटेड ब्लॅक ORVM तसेच मोठ्या रेडिएटर ग्रिल देखील मिळतील.
दोन इंजिन पर्याय
आता पुढील फीचरबद्दल बोलूया, तर नवीन अल्टोमध्ये दोन इंजिन पर्याय मिळू शकतात. हे नवीन १.०L DualJet पेट्रोल इंजिनसह लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. जे ६७hp ची पॉवर आणि ८९Nm कमाल टॉर्क जनरेट करते. याशिवाय, अल्टो आधीपासून अस्तित्वात असलेल्या ७९६cc पेट्रोल युनिटसह येऊ शकते, जे ४७hp पॉवर आणि ६९Nm कमाल टॉर्क जनरेट करते. इंटिरियरबद्दल बोलायचे झाल्यास, मोठी टचस्क्रीन सिस्टम, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले, आयडल स्टार्ट/स्टॉप यासारख्या गोष्टींचा समावेश केला जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे