गोल पोस्ट गुन्हा वाई शहरात दहशत पसरवत दहा वाहनांच्या काचा फोडल्या

वाई शहरात दहशत पसरवत दहा वाहनांच्या काचा फोडल्या

वाई, १५ नोव्हेंबर २०२२: वाई शहरात रविवार पेठेत रामडोह आळी, ब्राम्हणशाही आदी ठिकाणी घराबाहेर लावलेल्या वाहनांची अज्ञात व्यक्तीकडून दहशत पसरवत काचा फोडल्याचा प्रकार आज सकाळी समोर आलाय. त्यामुळं या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

हा प्रकार नेमका कोणी केला आहे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय, वाई शहरात प्रथमच असा प्रकार घडल्यानं खळबळ उडालीय. सुमारे दहा वाहनांच्या काचा फुटल्याचं सांगण्यात आलंय. अजून या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झालेली नव्हती. या घटनेत ओमीनी, स्विफ्ट, अल्टो अशा कारच्या काचा फुटल्या आहेत.

हा सर्व प्रकार कोणी केला असावा, या परिसरात सीसीटीव्ही असून त्यात हा प्रकार कैद झाला असावा अशी ही शक्यता वर्तवली जात आहे. वाई शहरात याआधी अशा प्रकारची कधीही घटना घडली नव्हती. यामुळं पूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलंय.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version