नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर २०२२ : संसदेचे हिवाळी अधिवेशन यंदा ता. ७ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत होणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. या हिवाळी अधिवेशनात एकूण २३ दिवस कामकाज होणार असून, १७ बैठका होतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
हे पहिलेच अधिवेशन असेल ज्या दरम्यान राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती जगदीप धनखड राज्यसभा सभागृहातील कामकाज चालवणार आहेत. गुजरत आणि हिमाचल प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी असली, तरी देखील हे हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याचे सांगितले आहे.
संसदेच्या आगामी अधिवेशनात सरकार अनेक विधेयके मंजूर करण्याचा विचार करीत असताना, विरोधक या महत्त्वाच्या विषयांवर चर्चेची मागणी करू शकतात. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभासद दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर