महिलेने वृद्धाकडून मदत घेतली आणि त्यालाच घरी बोलावून केले ब्लॅकमेल

अमरावती, २९ ऑगस्ट २०२२: अडचणीत असलेल्या व्यक्तीला माणुसकीच्या भावनेतून समाजामध्ये मदत केलेली आपणास पाहायला मिळते. परंतु अमरावतीमध्ये एका महिलेने एका वृद्ध व्यक्तीकडून गाडीतील पेट्रोल संपल्याच्या बहाण्याने मदत मागितली आणि पुढे या वृद्धाला घरी बोलावून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.

नंदकिशोर भडांगे असं या पीडित व्यक्तीचं नाव असून ते नवसारी येथील नवोदय विद्यालयाजवळ राहातात. भडांगे हे रस्त्याने जात असताना एक अनोळखी महिलेनं त्यांना थांबवून आपल्या गाडीतील पेट्रोल संपले आहे म्हणून मदत मागितली. भडांगे यांनी महिलेला पेट्रोल पंपापर्यंत सोडले.

त्याच बरोबर या महिलेने मागितलेले ४०० रुपयेही परत करण्याच्या बोलीने दिले. त्याचवेळी पैसे परत करण्यासाठी म्हणून महिलेनं भडांगे यांचा मोबाईल नंबर घेतला. यानंतर तिने मदत करणाऱ्या वृद्धाला पैसे परत घेण्यासाठी आपल्या घरी बोलावले. तेथे पोहचल्यावर वृद्धाने आपण बाहेर थांबतो असे सांगितले. परंतु महिलेनं माझी बहीण पैसे घेऊन येणार आहे, असे सांगून वृद्धाला घरात बोलावले आणि दरवाजा बंद केला.

यानंतर आजून दोन महिला तिथे आल्या. तिघींनी मिळून वृद्धाला आधी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि नंतर साठ हजार रूपयांची मागणी केली.पैसे न दिल्यास तुमच्याविरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करु अशी धमकी दिली. यानंतर भडांगे यांना बाथरूममध्ये बंद करून ठेवले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा