तरुण-तरुणीचा वाद मिटवण्यासाठी गेली महिला, तरुणाने दिले पेटवून

नागपूर, २७ डिसेंबर २०२०: महाराष्ट्रातील नागपूर मधे दिवसेंदिवस गुन्हेगारी क्षेत्रामधे वाढ होताना दिसत आहे. भर रस्त्यात चालू असलेलं भांडण सोडवायला जाणं एका महिलेच्या जिवावर बेतलं आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेलाच एका तरुणाने जिंवत जाळले आहे.

शबाना अब्दुल जावेद (वय ४० रा. महेंद्रनगर), असे मृतकाचे नाव आहे. शबाना या अजनीतील टाटा मोटर्स येथे काम करीत होत्या. शुक्रवारी सायंकाळी कार्यालयातून काम आटोपून शबाना या मोपेडने घरी जात होत्या. सदरमधील हल्दिरामसमोर एका तरुणीसोबत तरुण वाद घालत असल्याचे शबाना यांना दिसले. त्यांनी मोपेड थांबवली. त्या तरुणाला समजविण्यासाठी गेल्या. समजावित असतानाच तरुण संतापला. त्याने बाटलीतील पेट्रोल शबाना यांच्या अंगावर टाकले. माचिसची काडी उगारून त्यांच्या अंगावर फेकली. त्यानंतर तरुण तरुणीला घेऊन मोटरसायकलने पसार झाला. शबाना यांना जळताना बघून नागरिकांनी धाव घेतली. पाणी टाकून आग विझवली. नागरिकांनी शबाना यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

नागपूर च्या हल्दिरामसमोर शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. भर चौकात घडलेल्या या घटनेने पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सदर पोलिसांनी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

हल्ली माणसाला माणुसकी राहीली नसून एक वेगळाच विकृतीचा कळस गाठत चालला आहे. आज भर रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे नाहक शबाना ला आपला जीव गमवावा लागला. पण या घटनेमुळे पुन्हा कुठे काही वाईट कृत्य घडत आसले तर कोणीही मदत करणार नाही कारण त्यांच्या मधे शबाना होण्याची हिम्मत राहणार की नाही हे त्यांनाच माहीती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा