नायगाव, दि. १० ऑगस्ट २०२०: आज जागतिक पर्यावरण धोक्यात आलेले आहे. आपल्याला जर श्वास आणि स्वच्छ हवा घ्यायची असेल तर प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावुन त्याचे संगोपन करावे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी’ या म्हणी प्रमाणे जाणिव झाली व बदल घडवुया अशा प्रकारचे आवाहन महिला पोलीस मित्रांनी केले आहे.
सामाजिक कर्तव्य या नात्याने महिला पोलीस मिञ ड्रिम्स निवारा या शाखेतील सदस्यांनी प्रयागधाम येथील सामाजिक वनीकरण जागेत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या उपक्रमाअंतर्गत रोपांची लागवड करणे, व लावलेल्या झाडांना आळी करुन पाणी घालणे, गवत काढुन झाडालगतची स्वच्छता करणे, ही कामे केली.
सामाजिक जाणिव ठेऊन सुलभा वाडेकर, आरती मुन, प्रशांती साळवे, प्रियांका जाधव, कविता टोळे, मनिषा कुंभार, मोना ननवरे, अर्चना वनपुरे, माधुरी टेळकीकर, सारिका जगताप, या महिला पोलीस मिञ भगिनिंनी वृक्षारोपणाचे कार्य केले आहे.
अशाच प्रकारचे कार्य सामाजिक जाणिव ठेऊन यापुढेही आम्ही करत राहु अशी सदिच्छा सर्वांनी व्यक्त केली. यावेळी सुरेश वाळेकर पोलीस मिञ संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे