चाकण, ०५ ऑगस्ट २०२२: दुर्गम भागात एकादी व्यक्ती अडकलीये, तिथं बचाव पथकाला पोहचता येत नाही तिथं या ड्रोनच्या सहाय्याने जाऊन बचाव कार्य करता येईल. कारण हा वरुणा ड्रोन इंडियन नेव्हीच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी सज्ज होतोय. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित वरुणा ड्रोनचं प्रात्यक्षिक ही पार पडलंय.
या वेगळ्या ड्रोनची निर्मिती पुण्यातील सागर डिफेन्स इंजिनियरिंग कंपणीने केलीय. चाकण एमआयडीसीं’चं आधीपासूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव आहे. आणि त्यात सागर डिफेन्स इंजिनियरिंग कंपणीने आणखी भर घातली आहे. सलग चार वर्ष परिश्रम घेत त्यांनी वरुणा ड्रोन साकारला आहे.
इंडियन नेव्हिने त्यांच्यासमोर जे आव्हान ठेवलं होतं, ते आता सत्यात उतरत असल्याचं कंपणीचे सहसंस्थापक मृदुल बब्बर यांनी दिली आहे.
अशी आहेत वरुणा ड्रोनची वैशिष्ट्ये
एक किमी उंचीपर्यत उड्डाण घेते, वीस ते पंचवीस किमी अंतर पार करते, पंचवीस ते तीस मिनिटांचा प्रवास करता येतो. १३० किलो वजनाची व्यक्ती अथवा वस्तु स्थलांतर करु शकतो.
स्वयंचलित, रिमोट अथवा कॉम्प्युटर अशा तीन पध्दतीने ऑपरेट होऊ शकते. १६ मोटार पैकी चार मोटार बंद पडल्या तरी ड्रोन सुरक्षित स्थळी पोहचू शकतो. विना इंधन केवळ बॅटरीवर हे उड्डाण घेतो, हे विषेश….
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर