बुलडाण्यात युवकांनी सुरू केला वेफर्सचा व्यवसाय

11

बुलडाणा , २४ सप्टेंबर २०२० : कोरोना प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र या संकटातूनच संधी शोधण्याचा प्रयत्न बुलडाणा जिल्ह्यातल्या युवकांनी केला आहे.

कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांतल्या कंपन्या बंद झाल्यामुळे अनेक युवकांना आपापल्या गावी परत यावं लागलं; मात्र त्यांना त्यांच्या गावातही रोजगार उपलब्ध होत नसल्याने त्यांची आर्थिक अडचण होत होती. यावर मार्ग काढण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या पिंपळगाव राजा इथले काही युवक एकत्र आले आणि त्यांनी कच्च्या केळीचे वेफर्स करून ते विकण्याचा व्यवसाय सुरू केला.

शेताच्या जवळच असलेल्या रस्त्यावर हा व्यवसाय सुरू करून त्यांनी बेरोजगारीवर मात तर केलीच आणि त्याच बरोबर केळी उत्पादक शेतकऱ्यांनाही या कोरोना संकटाच्या काळात मदतीचा हात दिला. संकटातून संधी शोधणाऱ्या बुलडाण्यातल्या या युवकांचा आदर्श इतरांनीही घेण्यासारखा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी