पुणे, २७ जून २०२१: जगात असे अनेक देश आहेत जेथे धोकादायक व्हायरस आणि बॅक्टेरिया ठेवलेले आहेत. पण हे इतके धोकादायक आहे की, निष्काळजीपणानं जर यातील काही वायरस किंवा बॅक्टेरिया लिक झाले तर पुन्हा एकदा नविन महामारी ला जन्म देऊ शकतात. नुकत्याच झालेल्या अभ्यासातून असं दिसून आलंय की तीन चतुर्थांश लॅबमध्ये बायोसिक्योरिटी किंवा बायोसेफ्टी सुरक्षाची कमतरता आहे. परंतु याची सुरक्षा अत्यंत मजबूत असली पाहिजे. कारण वूहानच्या लॅबमधून कोरोना विषाणूची गळती अशाच सुरक्षेच्या कमतरतेमुळं झाली असावी. वुहानची प्रयोगशाळा बायोसॅफ्टी लेव्हल -४ (बीएसएल -४) च्या श्रेणीत येते. जगात अशा अनेक प्रयोगशाळा आहेत ज्या या श्रेणीत आहेत परंतु तिथं सुरक्षाविषयक मानकं पाळले जात नाहीत.
द कनवरसेशन मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात असं नमूद केलंय की, जगातील अशा प्रयोगशाळांच्या सुरक्षेबाबत गंभीर पावलं उचलली पाहिजेत. हा लेख फिलिपा लेटोज, किंग्ज कॉलेज लंडन येथील विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा विषयाचे वरिष्ठ व्याख्याते आणि जॉर्ज मेसन विद्यापीठातील बायोडेफेंस ग्रॅज्युएट प्रोग्रामचे प्रोफेसर आणि संचालक ग्रेगरी कोबलेन्झ यांनी लिहिलाय
ग्रेगरी यांच्या मते जगातील २३ देशांमध्ये ५९ बीएसएल -४ लॅब आहेत. यापैकी केवळ २५ टक्के बायोसेफ्टीची पूर्ण काळजी घेतात. म्हणजेच त्यांनी ग्लोबल हेल्थ सिक्युरिटी इंडेक्स (जीएचएस इंडेक्स) चे मानक स्वीकारले आहेत. न्यूक्लियर थ्रेट इनिशिएटिव (एनटीआय) आणि जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटी (जेएचयू) यांनी संयुक्तपणे हा निर्देशांक तयार केलाय. जेणेकरून कोणत्याही देशाच्या बीएसएल -४ प्रयोगशाळेत कोणतीही अनुचित घटना घडू नये.
ग्रेगोरी कॉबलेन्ट्ज म्हणाले की, बायोरिस्क मॅनेजमेंट बाबत निष्काळजी करणाऱ्या या देशांना त्यांची धोरणं आणि संरक्षणात्मक उपाय बदलले पाहिजेत. जगात युरोपमध्ये बीएसएल -४ लॅबची संख्या सर्वाधिक आहे. इथं २५ प्रयोगशाळा आहेत. उत्तर अमेरिकेत १४ आणि आशियात १३ प्रयोगशाळा आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये ४ आणि आफ्रिकेत ३ लॅब आहेत. परंतु या प्रयोगशाळांपैकी केवळ ४० टक्के इंटरनेशनल एक्सपर्ट्स ग्रुप ऑफ बायोसेफ्टी एंड बायोसिक्योरिटी रेगुलेटर्स गटाचे सदस्य आहेत. ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशासकीय संस्था आहे जी प्रयोगशाळांच्या सुरक्षिततेस मान्यता देते.
ग्रेगरी म्हणाले की, या २३ देशांपैकी काही देश बीएसएल -४ प्रयोगशाळांचा दोन प्रकारे उपयोग करतात. पहिला, असेशौ संशोधन करणं ज्याचा आरोग्यास फायदा आहे. परंतु, त्यापासून नुकसान होण्याची शक्यता देखील आहे. दुसरा- सूक्ष्मजीव म्हणजेच पॅथोजेन्स मॉडीफाय करून ते अधिक धोकादायक व प्राणघातक बनवणं. दुसरा वापर अधिक धोकादायक आहे. कारण अशा संशोधनामुळंच कोरोनाव्हायरस वुहानच्या लॅबमधून बाहेर पडल्याचा दावा केला जातोय, ज्यामुळौ आज संपूर्ण जग त्रस्त आहे.
जगातील सर्व बीएसएल -४ लॅबपैकी ६० टक्के लॅब सरकार चालवित आहेत. २० टक्के विद्यापीठं आणि २० टक्के बायोडेफेंस एजन्सीद्वारे. या प्रयोगशाळांमध्ये संसर्गास कारणीभूत असणाऱ्या पॅथोजेन्सचा तपास आणि रिसर्च केलं जातं. तसेच पॅथोजेन्समध्ये अनुवांशिक बदल करून त्यांच्याद्वारे होणाऱ्या रोगांपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, हे काम करत असताना थोडीशी निष्काळजी सुद्धा जगभरात नवीन महामारीला जन्म देऊ शकते.
इंटरनॅशनल एक्सपर्ट्स ग्रुप ऑफ बायोसॅफ्टी अॅन्ड बायोसिक्युरिटी रेग्युलेटरमध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, सिंगापूर, स्वित्झर्लंड, यूके आणि अमेरिका यांचा समावेश आहे. परंतु, जगातील कोणत्याही लॅबनं वर्ष २०१९ मध्ये सुरू केलेल्या बायरिस्क मॅनेजमेंट सिस्टमवर स्वाक्षरी केली नाही. त्यावर स्वाक्षरी केली असती तर त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुरक्षा मानकांचं पालन करावं लागलं असतं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे