केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत, मंत्रिमंडळात महाराष्ट्राचा वरचष्मा दिसणार

मुंबई, ४ जुलै २०२३ : राज्य मंत्रिमंडळाबरोबरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा मागील काही दिवसात होती. नुकतीच राज्यात राजकीय उलथापालत झाली. आता काही दिवसात केंद्रात मोठे बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांना दिल्लीत संधी मिळण्याची शक्यता आहे. लोकसभेचा कार्यकाळ काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना केंद्रात संधी देण्यात येणार आहे. तर काही नेत्यांना मंत्रीपदातून मुक्त करून पक्षाचे काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. सध्या जो फेरबदल होणार आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे.

नव्या मंत्रीमंडळामध्ये कोणाला वगळले जाणार ? नवीन कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे. सगळ्यात जास्त संधी महाराष्ट्रातील नेत्यांना देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात नुकताच राष्ट्रवादीचा गट फुटून भाजपमध्ये गेल्यामुळे नेमकी संधी कुणाला मिळणार अशी देखील चर्चा आहे. महाराष्ट्रात एक वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांचा गट भाजप बरोबर गेल्याने भाजपने पुन्हा महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यावेळी भाजपच्या वरिष्ठांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदि विराजमान केले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची निराशा केली अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आणि राजकारकीय वर्तुळात होती. आता देवेंद्र फडणवीस यांना बढती देण्याची वेळ आली आहे. फडणवीस यांना दिल्लीत बोलवण्याची शक्यता अधिक आहे. मोदी सरकारच्या काळात त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात शिंदे गट भाजपमध्ये सामील झाला याला एक वर्षे झाले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षातील काही नेत्यांना केंद्रात संधी मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रतापराव जाधव यांना केंद्रात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भावना गवळी यांचे सुध्दा नाव चर्चेत आहे.

महाराष्ट्रात दोन दिवसापूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवारांनी राष्ट्रवादीचा एक गट घेऊन भाजपमध्ये एन्ट्री केली आहे. अजित पवारांना आश्वासन देण्यात आले आहे की, त्यांच्यासोबत असलेल्या एका नेत्याला केंद्रीय मंत्रीमंडळात संधी देण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या गटात असलेल्या प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रीपद मिळू शकते. प्रफुल्ल पटेल आता राज्यसभेचे खासदार आहेत. याआधी ते यूपीए सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री होते. मागच्या महिन्यात शरद पवार यांनी पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष बनवले होते. पटेल मंत्री झाले तर एक प्रकारे शरद पवारांना शह मानला जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा