मॉस्कोहून येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती, प्रवासी सुखरूप

नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर २०२२ : मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर घबराट पसरली होती. पहाटे ३.२० वाजता विमान दिल्ली विमानतळावर उतरले. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना खाली उतरवण्यात आले. यानंतर फ्लाइटची तपासणी करण्यात आली. फ्लाइटमध्ये ३८६ प्रवासी आणि १६ क्रू मेंबर्स होते.

एजन्सी झाल्या सतर्क

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना रात्री उशिरा ११.१५ वाजता एका मेलद्वारे माहिती मिळाली होती की, मॉस्कोहून दिल्लीकडे पहाटे ३:२० वाजता एफआय क्र. एसयु २३२ मध्ये बॉम्ब आहे. विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. यानंतर बॉम्बशोधक पथक, बचाव पथके तैनात करण्यात आली. विमान धावपट्टी २९ वर उतरले. सर्व प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात बॉम्ब सापडला नाही. यानंतर सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. फ्लाइटमध्ये ३८६ प्रवासी आणि १६ क्रू मेंबर्स होते. हा मेल कोणी आणि कुठून पाठवला याचा पोलीस तपास करत आहेत.

याआधी इराणहून चीनला जाणाऱ्या विमानांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर प्रवासी विमानाच्या वैमानिकांशी दिल्ली एटीसीशी संपर्क साधून विमान उतरवण्याची परवानगी मागितली. मात्र, भारताच्या बाजूने जयपूर आणि चंदीगडमध्ये विमान उतरवण्याचा पर्याय देण्यात आला होता. पण वैमानिकांनी विमान उतरवण्यास नकार दिला. यानंतर विमान सुमारे ४५ मिनिटे भारतावर उडत राहिले.

यानंतर भारतीय हवाई दल सतर्क झाले. त्यामागे हवाई दलाने सुखोई लढाऊ विमाने लावली होती. इराणकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर हे विमान चीनला पाठवण्यात आले. हे विमान भारताच्या सीमेबाहेर नेण्यात आले. मात्र, चीनमध्ये विमानाची तपासणी केली असता, विमानात बॉम्ब आढळून आला नाही. म्हणजेच बॉम्बची माहिती केवळ अफवा होती. लाहोर एटीएसने भारताला फोन केला आणि बॉम्ब नसल्याचे कळवले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा