मावळात शिक्षकांसह अधिकारीही कमी, शिक्षण व्यवस्थेची अवस्था वाईट

वडगाव मावळ, पुणे ५ ऑगस्ट २०२३ : मावळ तालुक्याच्या शिक्षण विभागात एकूण मंजूर असलेल्या ९६० पदांपैकी तब्बल १४२ पदे रिक्त असून, यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसह विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक या जागाही मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होण्याची शक्यता आहे.

शिक्षण विभाग व शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांच्या ५ पैकी २ जागा रिक्त आहेत. केंद्र प्रमुख्यांच्या २४ जागांपैकी तब्बल २० जागा, तर मुख्याध्यापकांच्या २८ पैकी तब्बल १९ जागा रिक्त आहेत. वास्तविक विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख्यांच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवत असतात.

या समितीमध्ये प्रशासकीय अधिकारी, शिक्षक प्रतिनिधी, लोक प्रतिनिधी, तज्ज्ञ मंडळींचा समावेश होता. या समितीच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवले जात होते. परंतु चार वर्षांपूर्वी सत्ता बदल झाल्यानंतर ही समिती बरखास्त झाली असून, त्यानंतर आजतागायत ही समिती गठीत करण्यात आलेली नाही. असं सांगण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा