भारत-चीन चर्चेवर कितपत तोडगा निघेल याची शाश्वती नाही: राजनाथ सिंग

लडाख, दि. १७ जुलै २०२०: रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लडाखमध्ये भेट दिली. यावेळी त्यांनी सीमेवर सुरू असलेल्या घडामोडींचा पूर्ण आढावा घेतला. यावेळी त्यांनी सैनिकांशी ही संपर्क साधला. या दरम्यान आज पॅरा कमांडोजने युद्ध अभ्यास करून शक्तिप्रदर्शन देखील केले. आपल्या भेटीदरम्यान राजनाथ सिंग यांनी सैनिकांना संबोधीत केले व चीनला देखील ताकीद दिली.

यावेळी ते म्हणाले की, “भारताच्या १ इंच जमिनीला जगातील कोणतीही ताकद हात लावू शकणार नाही. जर भारताच्या स्वाभिमानावर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते सहन करणार नाही आणि त्यांना योग्य भाषेत उत्तरही दिले जाईल. सध्या भारत आणि चीनदरम्यान जी काही चर्चा झाली ती सकारात्मक आहे. या प्रकरणाचा तोडगा निघाला पाहिजे. परंतु हा तोडगा कधी पर्यंत निघेल याची सध्या कोणतीही हमी मी आता देऊ शकत नाही,”

“आम्हाला अशांतता नाही तर शांतता हवी आहे. भारताने कोणत्याही देशाच्या स्वाभीमानावर कधी हल्ला केला नाही. परंतु भारताच्या स्वाभिमानावर हल्ला करण्याचा जर प्रयत्न झाला तर ते सहन केले जाणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा