काँग्रेसचे आमदार फुटून बाहेर पडतील अशी सूतराम शक्यता नाही, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

सातारा, ९ जुलै २०२३ : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण एवढ्या वेगळ्या वळणावर गेले आहे, की आता राज्याच्या राजकारणात कोण कधी कोणासोबत जाईल हे काही सांगता येत नाही. शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीमध्येही मोठया बंडाचा भूकंप झाला. अजित पवार हे आपल्या काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे महाराष्ट्रात महाभूकंप आला आहे. असे असताना आता महाराष्ट्र काँग्रेस फूटीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

यावर महाराष्ट्र काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राज्यातील काँग्रेसच्या विधानसभा सदस्यांची संख्या ४५ असून, त्यातील ३० किंवा त्याहून अधिक आमदार फुटून बाहेर पडतील अशी सूतराम शक्यता नसल्याचा दावा चव्हाण यांनी केला. मात्र, भाजपच्या गोटातून अफवा पसरवण्याचे काम होत आहे.जे शिवसेनेबाबत घडले तेच राष्ट्रवादी काँग्रेसबाबत घडेल आहे.

शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार फुटून भाजपसोबत गेले परंतु या आमदारांना मंत्रिपदाचे आणि वेगवेगळे प्रलोभन दाखवण्यात आली या सरकारला साधी विधान परिषदेच्या बारा आमदारांची नेमणूक करता येत नाही,असे चव्हाण म्हणाले. काँग्रेस मधून कोणीही फुटून बाहेर जाणार नाही. पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश सदस्य बाजूला गेले तर ती पक्षांमध्ये फूट ठरू शकते. काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबाळ ४५ आहे म्हणजे त्यापैकी ३० ते ३१ आमदार फुटून बाहेर पडले तर आमचा गट फुटला असे म्हणावे लागेल. परंतु आमच्यातून कोणीही बाहेर जाणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा